जात कधीच जात नाही
- Kunal Mayavati Dattu जात ही संपूर्ण मानवास लागलेली एक कीड आहे. जी कधीच नष्ट होत नाही. जातीमुळे जातीजातीत माणूस विखुरल्या गेला. माणूस माणसाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. तो खालच्या जातीचा मी वरच्या जातीचा असा भेदभाव करू लागला. परंतु हे कुठेतरी थांबायला हवं. मनुष्य कोणत्याही जातीचा का असेना शेवटी तोही आपल्यासारखाच! त्यालाही आपल्या प्रमाणे दोन डोळे कान आणि एक नाक दिलंय जो कोणी या विश्वाचा निर्माता असेल त्याने भेदभाव नाही केला. तर आपण भेदभाव करणारे कोण? कोणी आपल्याला अधिकार दिला भेदभाव करण्याचा...... आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय. आणि तोही कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता. येथे प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा, फिरण्याचा आणि महत्त्वाचे म्हणजे मुक्तपणे संचार करण्याचा अभिव्यक्त होण्याचा आपल्याला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने बहाल केला आहे. ...