चित्रपटातील तिची भूमिका

             चित्रपट हा आपल्याच आवडीचा विषय...! जो आपल्याला काही क्षणासाठी का होईना त्या चित्रपटांमध्ये घुसण्यास भाग पाडतो. तो चित्रपटांमधील अभिनेत्याच्या आणि अभिनेत्रींच्या भूमिकांनी..
           कधी माणसाला खळखळून हसवणाऱ्या तर कधी रडवनाऱ्या इतक्या प्रभावी भूमिका चित्रपटांमधील संपूर्ण टीम पार पाडत असते. आणि चित्रपटाचे वेड लागते ते काही औरच.... 
           प्रत्येक चित्रपटाची आतापर्यंत एकच शोकांतिका बघायला मिळाली. ती म्हणजे त्यात स्त्रीला कायम दुय्यम, दुर्बल, आणि कमजोर समजलं गेलयं. कोणताही चित्रपट असो जेव्हा अभिनेत्री संकटात असते तेव्हा तिला वाचवायला नेहमी हिरोच  का येतो? त्या स्वतःच रक्षण का करू शकत नाही?
         आतापर्यंत असा सिनेमा का तयार झाला नाही. ज्यामध्ये स्त्री ही त्या चित्रपटाची हिरो आहे. तीच प्रत्येक वेळेला हिरोईनच का? ती स्वतःची लढाई स्वतः का लढू शकत नाही. हा प्रश्न जोपर्यंत आपणास पडणार नाही. तोपर्यंत स्त्रीच्या जगण्याचा स्थर उंचवणार नाही...
   स्त्री ही मुळात कमजोर नाहीच ती खूप कणखर आणि समजूतदार आहे. आपण ही  कधीतरी तिला समजून घेऊन समाजालाही लाजवेल आणि स्त्रियांचा सन्मान होईल असे चित्रपट बनवतं नाही. तोपर्यंत समाजातही बदल घडणार नाही. कारण चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा असतो.असे समजले जाते. आता याच आरशाचे काम आहे समाजाला योग्य चित्र दाखवनं....!

                             - KUN@L PAITHANE 
 

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚