तनुबाई बिर्जे
- Kunal Mayavati Dattu Paithane
तानुबाई बिर्जे या भारतातील पहिल्या महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. 1876 मध्ये पुण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील देवराव खोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि शेजारी होते. सोबतच तानुबाई बिर्जे यांच शिक्षण वेताळ पेठेतील महात्मा फुले यांच्याच शाळेत झालं. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या त्या मानसकन्या होत्या. आणि या सर्व बाबींमुळे ताणूबाई यांचे जीवन सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या सहवासात गेल्यामुळे त्यांचा संपर्क सत्यशोधक चळवळीशी आला. आणि या विचारांमुळे त्यांच्याकडे सत्यशोधकीय विचार धारा आली...
वर्ष होतं 1893 च याच वर्षी 26 जानेवारी रोजी तानुबाई बिर्जे यांचा विवाह वासुदेव बिर्जे यांच्याशी झाला. लागली चार वर्षानंतर म्हणजेच 1897 मध्ये दीनबंधू या वृत्तपत्राची जबाबदारी वासुदेव बिर्जे यांनी स्वीकारली. जवळपास नऊ वर्ष त्यांनी दीनबंधू वृत्तपत्र चालवले. मात्र काही काळानंतर त्यांचा प्लेगच्या आजाराने मृत्यू झाला. आणि त्यांच्या जाण्याने दीनबंधू बंद पडतं की काय?अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र तानुबाई यांनी न डगमगता प्रबोधनाचे कार्य आणि दिनबंधू वृत्तपत्राची जबाबदारी स्वीकारली. ज्या काळात स्त्रीकडे चूल अन् मुलं याच नजरेने पाहिले जात होतं. त्यावेळी त्या काळात ताणूबाईंनी सत्यशोधकीय पत्रकारितेची धुरा सांभाळली.
तानुबाई बिरजे या पहिल्या महिला पत्रकार ज्यांनी सत्यशोधक मार्गाने समाजामध्ये विचारांची देवाण-घेवाण करत बदल घडविला. बहुजनांचा उद्धाराची मनात असलेली तळमळ आणि सामाजिक सुधारणांसाठी वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले होते.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या प्रबोधनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या एक उच्च यशस्वी आणि सक्षम संपादक म्हणून तानुबाई बिर्जे यांनी पत्रकारितेमध्ये आपला ठसा यशस्वीपणे उमटविला...
Comments