लोकशाही म्हणजे काय

                       लोकशाही म्हणजे प्रौढ मताधिकार्‍यांच्या आधारे खुल्या आणि निःपक्षपाती निवडणूका द्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधी द्वारे चालणारे राज्य म्हणजे लोकशाही होय. लोकशाही म्हणजे यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असतो. त्याचबरोबर लोकशाही म्हणजे शासन निवडण्याचा आणि त्याद्वारे कायदे बनविण्याचा अधिकार राजकीय निर्णय घेण्याचा प्रकार होय.

                  आपल्या देशात खरंच लोकशाही आहे का ?असा प्रश्न नेहमीच पडतो .अर्थात ती आहेच परंतु आताची देशाची स्थिती बघता लोकशाहीच्या प्रतिमेला हे सरकार हादरे देण्याचं काम करत आहे. 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारताच्या इतिहासात नोंद ठेवण्यासारखी आहे .कारण याच दिवशी आपल्या देशात नोटबंदी झाली होती .रात्री आठ ते दहा च्या सुमारास मोदींनी ही नोटबंदी रातोरात करून टाकली .आणि तीही याची कुठलीही पूर्वसूचना न देता कोणत्याही पक्षांना संसदेला विचारात न घेता आणि महत्त्वाचं म्हणजे जनतेचे न घेता ही नोटबंदी करण्यात आली .

                                  लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही याच व्याखेनुसार आपण असे म्हणू शकतो की ,सर्वात वरचे कोण असेल तर ती जनता आहे .आणि जनता ही किंगमेकर असते .तीच आपला राजा निवडते .म्हणून ज्या जनतेने आपल्याला निवडून दिले आपल्यावर विश्वास ठेवलाय आणि त्या जनतेला विचारात घेऊन नोटबंदी करणे हे सरकारचं काम असतं .आणि असं काही कधीही झालं नाही .आणि म्हणूनच सारखं वाटतं संविधान धोक्यात आहे आपली लोकशाही धोक्यात आहे .आणि हेच कुठेतरी खऱ्या अर्थाने थांबायला हवं.....

            - Kunal Mayavati Dattu Paithane 

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚