जात कधीच जात नाही

              - Kunal Mayavati Dattu


   जात ही संपूर्ण मानवास लागलेली एक कीड आहे. जी कधीच नष्ट होत नाही. जातीमुळे जातीजातीत माणूस विखुरल्या गेला. माणूस माणसाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. तो खालच्या जातीचा मी वरच्या जातीचा असा भेदभाव करू लागला.

                    परंतु हे कुठेतरी थांबायला हवं. मनुष्य कोणत्याही जातीचा का असेना शेवटी तोही आपल्यासारखाच! त्यालाही आपल्या प्रमाणे दोन डोळे कान आणि एक नाक दिलंय जो कोणी या विश्वाचा निर्माता असेल त्याने भेदभाव नाही केला. तर आपण भेदभाव करणारे कोण? कोणी आपल्याला अधिकार दिला भेदभाव करण्याचा......

                 आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय. आणि तोही कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता. येथे प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा, फिरण्याचा आणि महत्त्वाचे म्हणजे मुक्तपणे संचार करण्याचा अभिव्यक्त होण्याचा आपल्याला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने बहाल केला आहे.

                   संविधानामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करण्यात आलेला नाही. आपण नेहमी म्हणतो की, त्यांना आरक्षण जास्त का त्यांनाच का? जास्त सवलत आम्हाला का नाही? यामुळे आमच्यावर अन्याय होतो.  अशी अनेकांची खंत असते. परंतु आपण हे विसरतो की, त्यांना आपल्यापेक्षा जास्त आरक्षण आहे. कारण ते आपल्याही पेक्षा खूप मागासलेले आहे. आणि त्यांचा तोच आर्थिक आणि सामाजिक स्तर सुधारावा . आपण आणि ते समान यावेत यासाठी त्यांना जास्त आरक्षण देण्यात आले आहे. आणि याचा अर्थ संविधानाने कोणावर अन्याय केला असा अजिबात होत नाही. उलट भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता ,बंधुता ,न्याय यांसारख्या तत्त्वांची शिकवण देऊन आपलं प्रत्येकाचं जगणं समृद्ध केलं आहे....!

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚