संघर्ष अस्तित्वाचा

             -  Kunal Mayavati Dattu Paithane 

     अस्तित्व म्हणजे काय? तर अस्तित्व म्हणजे आपलं असणं होईल मग ते शारीरिक असो वा काल्पनिक असण्याला महत्त्व आहे परंतु आजही आपल्या समाजात आपण अनेकांचं असणं नसल्यासारखं गृहीत धरतो

                  माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जन मग तो  कुठल्याही जाती धर्मातील असो किंवा गरीब श्रीमंत असो अशा प्रत्येकाला आणि त्याच्या जगण्याला संविधानाने महत्त्वाचे संविधानामध्ये महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे .कारण सर्वांनाच दोन डोळे , कान, एक नाक या सर्व गोष्टी सर्वांना समान दिल्या आहे.. मग ज्याने दिल्यात त्याने कधी भाव केला नाही तर मग आपल्याला कोणी अधिकार दिला गरीब श्रीमंत ,खालच्या जातीचा, वरच्या  मुळात जात ही मनुष्यनिर्मित आहे. आणि याचा कुठल्याही देवाशी संबंध नाही .अथवा जातीशी ही नाही. माणसाने त्याच्या सोयीप्रमाणे किंवा आवश्यकतेप्रमाणे जाती बनविल्या आहेत.

                   आपल्या समाजामध्ये आजही गैरसमज रूढ झाला आहे की , ज्यांना आरक्षण आहे त्यांना कमी मार्क असून देखील त्यांना सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतले जाते .परंतु आम्हाला त्यांच्या पेक्षा जास्त मार्क मिळवून देखील आम्हाला सरकारी नोकरीत सामावून घेतले जात नाही .आणि मग अशावेळी आरक्षणाला दोष मिळतो .त्यांना आरक्षण आहे म्हणून तो लागला नाही तर मीच लागलो असतो. फक्त माझ्याकडे आरक्षणात नाही तर हा खूप मोठा गैरसमज आपल्या समाजात रूढ झाला आहे .हा गैरसमज मिटविण्याचा हा छोटासा प्रयत्न आपण करूया... तो जर आरक्षण मिळवून इथपर्यंत आला असेल तर त्याच्या मागे त्याचा खूप मोठा संघर्ष दडला आहे .सर्वप्रथम तर त्याला शिक्षण भेटले का नाही? हा प्रश्न शिक्षणासाठी पैसे लागणार? हा प्रश्न घरची परिस्थिती आपण शिकत राहिलो तर घर कसं चाललंय? या सर्व बाबींवर मात करून तो शिकला ,पुढे आला आणि सरकारने त्याचा हाच  संघर्ष पाहून त्याला नोकरी दिली .तर काय चुकीचं केलं. तो त्याचा अधिकार होता .तो त्यांनी मिळवला तसेच आपण ही खूप शिकू आणि आपले अधिकार मिळवून कारण शेवटी प्रत्येकाच्या असण्याला महत्त्व आहे.....!

 

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚