तिची कामे
-Kunal Mayavati Dattu Paithane
स्त्री जिच्या असण्याला या विश्वात खूप महत्त्व आहे .कारण ती प्रत्येक रूपात आपल्याला हवी असते कोणाला आई म्हणून ,कोणाला ताई म्हणून तर कोणाला बायको म्हणून कारण की तिच्या प्रत्येक भूमिका अगदी चोख पणे पार पाडत असते. आणि आपल्या कुटुंबाचा समाजाचा उद्धार करत असते.
पण आजही तिचे कष्ट मेहनत काम अमान्य केले जाते. सकाळी उठल्यापासून पाणी भरण्यापासून नाश्ता ,जेवण बनवणे ,मुलांना तयार करून शाळेत पाठवणे. घरातील मंडळींना कामाला जाण्यासाठी त्यांची सर्व कामे ती करत असते. घराची साफसफाई यांसारखीच खूप कामे स्त्री तिच्या दैनंदिन आयुष्यात कायम करत असते .तरीही आपण कामावरून आल्यावर मोठ्या थाटात सांगतो, काय काम करतेस तू ?घरीच तर असते . फक्त टीव्ही बघत . तर इथेच आपण चुकतो. कारण आपण स्त्रीला आतापर्यंत समजूनच घेतलेले नाही. कारण आतापर्यंत आपण फक्त तिच्याकडे वस्तू म्हणून बघत आलोय. आपण कधी तिच्या जागी आपल्याला ठेवून बघितलं का? आपल्याला एक जरी काम सांगितलं तर आपण कारकुर करतो. कंटाळा आला म्हणतो .किंवा मी नाही करत असं म्हणत असतो .परंतु तिला कंटाळा जरी आला तिची इच्छा जरी नसली ,तरी मुक्तपणे आणि हसत खेळत ती आपली कमे चांगल्या पद्धतीने पार पाडत असते. आणि आपला संसार पुढे नेत असते .कुठल्याही मोबदल्याशिवाय फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाच्या आपुलकी खातर कारण तिला माहिती असतं ही माणसं आपली आहे.आणि तिला आशा आहे की एक दिवस हा समाज तिला समजून घेईल .आणि खूप मोठा बदल या जगात घडेल....!
Comments