Posts

Showing posts from December, 2021

माणुसकीची जात निभावणारे हात आजही जिवंत आहेत....

                 जेवण करून नुकताच फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो होतो. आणि एका चहाच्या हॉटेल समोर कॉल वर बोलत उभा होतो.....!                       तेवढ्यात पायात चप्पल नसलेला, दाढी ,केस वाढलेला आणि विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीतही स्वेटर नसलेला थंडीने थरथर कपणारा माणूस चहाच्या हॉटेलच्या दिशेने येत होता .आणि हॉटेलकडे बघत होता. त्याच्याकडे बघून काळात होतं की, त्याला त्या हॉटेल मधील काहीतरी पाहिजे होते. हे त्याकडे बघून स्पष्ट दिसत होते. पण मागणार कसे ? हॉटेल मालक काय फुकट देणार नाही. हा ही त्याच्या मनात विचार आला असेल...!           पण तेवढ्यात तिथेच एका टेबलावर 2 "माणसे" चहा पीत बसली होती. त्यातील एकाने त्या माणसाकडे बघितले आणि त्याला त्याच्या मनातील तळमळ समजली होती.आणि त्याने लगेच त्याला विचारले चहा घेणार का? तो होकार -नकार देण्याच्या आत सांगितले एक चहा "यांना ही द्या".. आणि हा व्यक्ती हॉटेल कडे गेल्या गेल्या त्यांना चहा दिला गेला. तो व्यक्ती चहा घेऊन टेबलच...