मानवी विकासात रस्त्यांची भूमिका

                             मानवाचे जीवन समृद्ध करण्यामध्ये रस्त्याची भूमिका फार मोलाची राहिली आहे. कारण  रस्ते विकासामुळेच संपूर्ण देशभरात रस्त्याचे जाळे तयार करता आले आहेत. आणि आवश्यक गरजा जवळपास प्रत्येकांपर्यंत पोहोचवणं किंवा भागवणे शक्य झालं.

                          परंतु या रस्त्याचा पाहिजे अजून तसा विकास अजिबात झालेला नाही. कारण रस्त्याचे आयुष्य फारच कमी केले आहे .जसे की पहिले इंग्रजांच्या काळात अनेक फुल इमारती बांधल्या गेल्या अनेक फुल आणि इमारती तर शंभराऊन अधिक वर्ष जुन्या आहेत. आणि त्या ही शाबूत स्वरूपात त्या अजून तरी पडल्याची नोंद नाही. परंतु आताचे रस्ते आणि फुल इमारती अवघ्या काही वर्षांमध्ये नाहीशा होतात. तरी कशा?

                          आता बनलेला रस्ता तो फक्त पाच वर्षे कसा टिकतो सहा महिन्यापूर्वी उद्घाटन झालेला पूल तरी कसा तुटतो?

                   या सगळ्या गोष्टींचं मूळ आहे पैसा जेवढा निधी सरकार देत त्यापैकी अर्ध्या सुद्धा पैशांमध्ये हे लोक काम करत नाहीत कारण आता आपण जर काम चांगल्या दर्जाचे केलं तर ते खूप वर्ष टिकेल आणि लवकर टेंडर निघणार नाही नेत्यांपासून सुपरवायझर पर्यंत कोणालाही पैसे खायला मिळणार नाही आणि जर पैसे नाही मिळाले तर अशा लोकांचा सत्तेवर येऊन फायदा तरी काय?

 यासाठीच हा खेळ खंडोबा वर्षानुवर्षे आपल्याकडे सुरू आहे.....!

                                            - KUN@L

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚