सामाजिक न्याय

               -Kunal Mayavati Dattu Paithane 


 सामान्य मूल्यांवर अधिष्ठित असलेली न्यायाची संकल्पना म्हणजे सामाजिक न्याय होय. सामाजिक न्याय मध्ये प्रत्येक व्यक्ती, समाज ,धर्म ,लिंग ,वंश हे सर्व संविधानापुढे समान समजले जातात..

                        आपल्या भारताचे संविधान आपणास स्वातंत्र्य ,समता,बंधुता आणि न्यायाची शिकवण देतो. जी माणसाला माणूस म्हणून प्रत्येकाला माणुसकी बहाल करते. व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो ,स्त्री -पुरुष, श्रीमंत, गरीब या सर्वांना सगळीकडे समान वागणूक मिळेल. कोणावरही अन्याय होणार नाही. अर्थातच वरी म्हटल्याप्रमाणे सामाजिक न्याय हा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रदान करतो.

           डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार सामाजिक न्याय ही संकल्पना समता ,स्वातंत्र्य ,बंधुता एकता ,न्याय ,अभिव्यक्ती यावर आधारित आहे.

             ∆सामाजिक न्यायाचे प्रमुख उद्दिष्टे∆

           ✓जाती

            ✓धर्म

           ✓लिंगभेद

           ✓ सत्ता

           ✓गरीब

           ✓श्रीमंत

वरील सर्व बाबीतील असमानता नष्ट करणे. हे मुख्यतः सामाजिक न्यायाचे उद्दिष्टे आहे. जे माणूस म्हणून जगण्याचा आणि मुक्त संचार करण्याचा हक्क आपल्याला देत.

                        सामाजिक न्याय हा सर्व समाजातील सर्व लोकांना सामाजिक राजकीय आर्थिक बाबतीत समान हक्क प्रदान करण्याचे ध्येय ठेवतो.

                       स्त्री पुरुष समानता तळागाळातील लोकांचा सन्मान मानव अधिकार, समाजाचे कल्याण, बंधुभाव, परस्परांविषयी आपुलकी ,सहिष्णुता आणि प्रेम या सर्व बाबींचा अंगीकार म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय होय. जो तुम्हाला स्वातंत्र्य ,समता, न्यायाची शिकवणं देतं....!

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚