शिक्षण व्यवस्था....!
शील, क्षमा, नम्रता म्हणजे शिक्षण होय. जे आजच्या आधुनिक युगात अत्यंत महत्त्वाचं आहे. "शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते .आपण या जगात कशासाठी आलो हे कळते ".ह्याच ओळी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लागू पडतात.
आपल्या देशातील शिक्षण व्यवस्था नोकर निर्माण किंवा बनवणारी शिक्षण व्यवस्था आहे .त्याला लहानपणापासूनच सांगितलं जातं तू सरकारी नोकरी कर पोलीस हो, इंजिनीयर हो ,तुला चांगला जॉब मिळाला पाहिजे .म्हणून तू चांगला शिक अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात. बारावी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत जवळपास आपण 25 वर्षाचे होईपर्यंत आपल्याला शिकवल्या जाते .आणि मग कुठेतरी पोलीस मध्ये ,बँकेत ,आयटी कंपनीत मोठ्या ऑफिसमध्ये ,सरकारी खात्यात जॉब मिळतो. परंतु जॉब मिळण्याचे प्रमाणही कमी झालं आहे. आता फक्त सुशिक्षित बेरोजगार विद्यापीठातून बाहेर पडतात.
आयुष्यभर फक्त नोकरीसाठी संघर्ष करतात आणि ते मेहनतीने जरी चांगल्या पदावर गेले तुम्ही डीसीपी ,एसीपी ,तहसीलदार ,कलेक्टर जरी झाले. किंवा आपल्याला हे बनण्यासाठी किती वर्षे लागली अभ्यास मेहनत शिक्षण पैसा किती खर्च करून आपण इथपर्यंत पोहोचतो. परंतु वाईट तेव्हा वाटतं जेव्हा आपल्यापेक्षा कमी शिकलेला मंत्री राजकारणी सातवी पास माणूस आपली बदली काही तासात करतो. मग तुम्हीच सांगा काय फायदा एवढे शिकून....
नोकऱ्या जवळपास कुठेच उरल्या नाहीत तर आजच्या तरुणांनी शिक्षण तर तुम्ही घ्याच. पण नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करा. पैसे नसेल तर बँकेकडून त्यांच्या अटी पूर्ण करून कर्ज घ्या .पण व्यवसाय करा .कारण उद्या तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैसा लागेल पण तो फक्त आणि फक्त व्यवसायातूनच मिळवता येऊ शकतो. नोकरी करून तुमच्या फक्त आणि फक्त गरजा पूर्ण होतील .स्वप्न नाही. म्हणून व्यवसाय करा आणि व्यवसायात उतरा.
आत्मनिर्भर बना ,जग फिरा ,नवनवीन क्रांती घडवा, मनसोक्त जगा आणि इतका प्रवास म्हणजेच तुमचा विकास होय.....
- KUN@L
Comments