तिचं असणं

             प्रत्येकाच्या आयुष्यात ती असते कधी ताई म्हणून, कधी आई म्हणून, तर कधी बायको म्हणून ती प्रत्येकाच्या आयुष्यात असते. आणि तिचं  हेच असणं आपलं जीवन समृद्ध करत असतं....

              तिचे स्थान समाजात नेहमीच दुय्यम राहिले आहे. किंवा पुरुषांपेक्षा नेहमीच कमीअसते. कारण ती स्त्री आहे म्हणून ती उठल्या पासून किंवा जन्मल्यापासून सर्व कामे करायला लागते. ती छोटी असताना आईला भांडे घासू लागते. तर कधी वडिलांना पाणी आणून देते. अशी कामे ती छोटी असताना आपल्या हाताने आणि मनाने करत असते. थोडी मोठी झाली की, ती आईला घर कामात मदत करत असते. पाणी आणू लागते, तर कधी वडीलधाऱ्यामंडळींना जेवण वाढण्यास मदत करत असते. जशी -जशी ती मोठी होत जाते, तसा तिच्या कामाचा व्याप वाढत जातो. त्याच्यावर बंधने येतात लहानपणी मुक्त बागडणारी ,खेळणारी आता मोठी झाली असल्याने खेळू शकत नाही, एकटी कुठे जाऊ शकत नाही, बाहेर पडू शकत नाही, आणि जरी बाहेर जाणार असली तरी तिच्यासोबत तिचा छोटा भाऊ पाठवतात. तर का? तर तो तिचे रक्षण करतो म्हणून किंवा ती त्याला राखी बांधते म्हणून, उलट बहिणीने त्याला राखी बांधली पाहिजे.चल मीच तुझं रक्षण करते. शेवटी करायचं तर रक्षणचं आहे ना? हे सर्व घडत असताना ती कुटुंबासाठी राबत  असते. काही काळाने तिचं लग्न होतं. तेव्हा ही ती आपल्या परिवाराची काळजी घेण्यापासून मुलांचे पालन पोषण ताई ,आई ,बायको  अशा सर्व भूमिका ती पार पडत असते. तेही कोणत्याही मोबदल्या शिवाय,

              ती नेहमीच पुरुषांपेक्षा पुढे राहिली आहे. पण समाजाने नेहमीच तिला कमजोर समजला आहे. पण ती मुळात कमजोर नाही. ती खूप समजूतदार ,खणखर आणि कुटुंबाची भाग्यलक्ष्मी असते. म्हणून तिला जपा...!


                                 -KUN@L PAITHANE 

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚