Posts

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚

 14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚        प्रेम                      ❤️प्रेम म्हणजे एका सुंदर संकल्पनेचा जन्म ज्यामध्ये आयुष्य, निसर्ग ,माणुसकी अशा गोष्टी दडलेल्या आहेत. आणि याच प्रेमाणे आपलं आयुष्य समृद्ध, सुंदर आणि सुखकर केलं आहे ..कारण प्रेम म्हणजे माणूस बनण्याची प्रक्रिया ..!आणि प्रेमाचा दिवस म्हणून आपण 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत असतो.     जे प्रेम आपण माणसांवर करतो. तेच प्रेम आपण निसर्गावर या पर्यावरणावर करूया .ज्याने फक्त आतापर्यंत आपल्याला भरभरून दिलं. मायेची सावली दिली ,तहान भागवण्यासाठी पाणी दिलं, जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन, तर स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी निरभ्र आकाश दिले... हे सर्व -सर्व काही त्याने आपन न मागता आपल्याला दिलय... पण माणूस म्हणून आपण त्याला काय दिलं काहीच नाही ना??? उलट कचरा ,प्लास्टिक, प्रदूषण यासारख्या गोष्टीचा वापर करून आपण त्या निसर्गात फेकून दिल्या. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आपणच करत आहोत .पण हे कुठेतरी थांबायला हवं. आणि  म्हणूनच "टीम तरुणा...

बंधन तोडीत यावं....

                               प्रत्येक स्त्री ही स्वतंत्र असते. जेव्हा ती "नाचते" तेव्हा ती समाजाने लादलेल्या बंधनातून ती मुक्त होत असते... आणि प्रत्येक ठिकाणी पुरुषी वर्चस्वाचा उधो - उधो करणाऱ्या समाजाला आणखी ती समजलीच नाही. तीही तुमच्या आमच्या सारखी एक माणसाचं तर आहे. मग सगळे कामे तिनेच का करायची.??? ती मुलांना शाळेला , नवऱ्याला ऑफिस ला, जाण्यासाठी तीची चाललेली धावपळ यासारखी अनेक कामे ती दिवसभरात करत असते. आपल्या कुटुंबासाठी ती राब- राब राबत असते. सगळ्याची काळजी घेते, तरी सुध्धा आपण म्हणतो तू काय करते घरीच तर असते दिवसभर फक्त टीव्ही बघत.. पण आपण हे विसरतो की, ती आपल्यासाठी किती झिजली आहे.. आपल्यासाठी ती रात्रीचा दिवस करते. हे आपण समजून घेतले पाहिजे.....      जी तुमची आवडती व्यक्ती असते. तिला तुम्ही किती जीवापाड जपता . तिची काळजी घेता. वेळप्रसंगी तिला समजून सुध्धा घेता..पण जर तिने पुरुषी मानसिकतेला किंवा पुरुषी वर्चस्वाच्या विरुद्ध जर काही केले तर एका क्षणात तिला नजरेतून उतरवता अस ...

सुगंधी बाग आहे ती

                           आज सकाळी 5 वाजता उठलो. आणि आवरून रस्त्याने चालत होतो. परंतु जेव्हा मी उठलो ना तेव्हा एका क्षणात मी टीम तरुणाई ने आपल्याला दिलेल्या, निर्माण केलेल्या विश्वात गेलो. त्या सर्व गोष्टी आठवत होत्या. सकाळी पाचला उठणे, फ्रेश होणे , काढा घेणे या सर्व गोष्टी आठवतच होत्या .तेवढ्यात समोरून मित्र आले .आणि आम्ही फुल मार्केटमध्ये गेलो .कारण उद्या सहा जानेवारीला पत्रकार दिन असल्यामुळे आमची तयारी आजपासून सुरू झाली होती . तिथे अनेक प्रकारचे फुल दिसली झेंडू ,शेवंती गुलाब ,मोगरा यांसारखी अनेक फुले तिथे होती. आणि हे सगळं बघून मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची आठवण झाली. त्या विश्वात आपण खरंच किती खुश होतो. ते आयुष्य आपण किती मनमुरादपणे जगलो .एकमेकांना फुल देणं ,कधी चाफा दिला ,तर कधी आणखीन कुठल्यातरी फुल  दिलं. भावना मात्र एकच होती प्रेम, आपुलकी ,जिव्हाळा पण जेव्हा मी फुल मार्केटमध्ये गेलो ना तेव्हा त्या सगळ्या फुलांमध्ये मला तुम्हीच दिसत होता.  ते फुलं मला तुमची आठवण क्षणाक्षणाला करून देत होते. फुल घ्याय...

जात कधीच जात नाही

              - Kunal Mayavati Dattu    जात ही संपूर्ण मानवास लागलेली एक कीड आहे. जी कधीच नष्ट होत नाही. जातीमुळे जातीजातीत माणूस विखुरल्या गेला. माणूस माणसाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. तो खालच्या जातीचा मी वरच्या जातीचा असा भेदभाव करू लागला.                     परंतु हे कुठेतरी थांबायला हवं. मनुष्य कोणत्याही जातीचा का असेना शेवटी तोही आपल्यासारखाच! त्यालाही आपल्या प्रमाणे दोन डोळे कान आणि एक नाक दिलंय जो कोणी या विश्वाचा निर्माता असेल त्याने भेदभाव नाही केला. तर आपण भेदभाव करणारे कोण? कोणी आपल्याला अधिकार दिला भेदभाव करण्याचा......                  आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलाय. आणि तोही कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता. येथे प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा, फिरण्याचा आणि महत्त्वाचे म्हणजे मुक्तपणे संचार करण्याचा अभिव्यक्त होण्याचा आपल्याला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने बहाल केला आहे.     ...

तनुबाई बिर्जे

              - Kunal Mayavati Dattu Paithane   तानुबाई बिर्जे या भारतातील पहिल्या महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जातात.  1876 मध्ये पुण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील देवराव खोसर हे महात्मा फुले यांचे सहकारी आणि शेजारी होते. सोबतच तानुबाई बिर्जे यांच शिक्षण वेताळ पेठेतील महात्मा फुले यांच्याच शाळेत झालं. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या त्या मानसकन्या होत्या. आणि या सर्व बाबींमुळे ताणूबाई यांचे जीवन सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या सहवासात गेल्यामुळे त्यांचा संपर्क सत्यशोधक चळवळीशी आला. आणि या विचारांमुळे त्यांच्याकडे सत्यशोधकीय विचार धारा आली...                     वर्ष होतं 1893 च याच वर्षी 26 जानेवारी रोजी तानुबाई बिर्जे यांचा विवाह वासुदेव बिर्जे यांच्याशी झाला. लागली चार वर्षानंतर म्हणजेच 1897 मध्ये दीनबंधू या वृत्तपत्राची जबाबदारी वासुदेव बिर्जे यांनी स्वीकारली. जवळपास नऊ वर्ष त्यांनी दीनबंधू वृत्तपत्र चालवले. मात्र काही काळानंतर त्यांचा प्लेगच्या आजाराने मृत्यू झ...

सामाजिक न्याय

               -Kunal Mayavati Dattu Paithane   सामान्य मूल्यांवर अधिष्ठित असलेली न्यायाची संकल्पना म्हणजे सामाजिक न्याय होय. सामाजिक न्याय मध्ये प्रत्येक व्यक्ती, समाज ,धर्म ,लिंग ,वंश हे सर्व संविधानापुढे समान समजले जातात..                         आपल्या भारताचे संविधान आपणास स्वातंत्र्य ,समता,बंधुता आणि न्यायाची शिकवण देतो. जी माणसाला माणूस म्हणून प्रत्येकाला माणुसकी बहाल करते. व्यक्ती कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो ,स्त्री -पुरुष, श्रीमंत, गरीब या सर्वांना सगळीकडे समान वागणूक मिळेल. कोणावरही अन्याय होणार नाही. अर्थातच वरी म्हटल्याप्रमाणे सामाजिक न्याय हा सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्रदान करतो.            डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार सामाजिक न्याय ही संकल्पना समता ,स्वातंत्र्य ,बंधुता एकता ,न्याय ,अभिव्यक्ती यावर आधारित आहे.              ∆सामाजिक न्यायाचे प्रमुख उद्दिष्टे∆   ...

तिची कामे

               -Kunal Mayavati Dattu Paithane      स्त्री जिच्या असण्याला या विश्वात खूप महत्त्व आहे .कारण ती प्रत्येक रूपात आपल्याला हवी असते कोणाला आई म्हणून ,कोणाला ताई म्हणून तर कोणाला बायको म्हणून कारण की तिच्या प्रत्येक भूमिका अगदी चोख पणे पार पाडत असते. आणि आपल्या कुटुंबाचा समाजाचा उद्धार करत असते.                     पण आजही तिचे कष्ट मेहनत काम अमान्य केले जाते. सकाळी उठल्यापासून पाणी भरण्यापासून नाश्ता ,जेवण बनवणे ,मुलांना तयार करून शाळेत पाठवणे. घरातील मंडळींना कामाला जाण्यासाठी त्यांची  सर्व कामे ती करत असते. घराची साफसफाई यांसारखीच खूप कामे स्त्री तिच्या दैनंदिन आयुष्यात कायम करत असते .तरीही आपण कामावरून आल्यावर मोठ्या थाटात सांगतो, काय काम करतेस तू ?घरीच तर असते . फक्त टीव्ही बघत . तर इथेच आपण चुकतो. कारण आपण स्त्रीला आतापर्यंत समजूनच घेतलेले नाही. कारण आतापर्यंत आपण फक्त तिच्याकडे वस्तू म्हणून बघत आलोय. आपण कधी तिच्या जागी आपल्याला ठेवून बघितलं का? आपल्याला एक जरी ...