" शेतकरी जगला पाहिजे ".
" शेतकरी जगला पाहिजे ". शेतकऱ्याचा दुःखामध्ये तल्लीम होऊन शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामाच्या मूल्याची व्यथा मांडणारे शब्द तमाम कष्टकरी शेतकरी मायबापास अर्पण...! हजारो वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावावर मानवाची निर्मिती झाली. तो चार पायांचा दोन पायांवर उभा राहून राहून चालू लागला. जंगलामध्ये एकटा राहणारा माणूस समूह करून राहू लागला. त्याला चाकाची कला अवगत झाली. त्याने आगीचा शोध लावला. हत्यारे बनविली ,कच्चे मास भाजून खाण्यास सुरुवात केली. आणि जवळच असलेल्या पडीत जमिनीस करण्यास सुरुवात केली. आणि येथूनच सर्वप्रथम कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतीची सुरुवात झाली. आणि तिने जी गती पकडली ती कायमची कधीही न थांबण्यासाठी, माणसाच्या विकासासाठी, माणूस जगविण्यासाठी,ऊन- वारा -पाऊस, सारं काही सोसून माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी..! ...