भावना

                     भावना म्हटलं की याचा थेट संबंध हृदयास येतो .मनाला सुख देऊन जातात. तर कधी दुःख .प्रत्येक वेळी ,प्रत्येक ठिकाणी बोलणं महत्त्वाचं नसतं. महत्त्वाच्या असतात त्या भावना समजण्यासाठी माणसाकडे मन असावं लागतं .आणि तेच फॅन्ड्रीच्य समीक्षकाकडे नव्हतं .असं मला वाटतं .कारण सांगितले तर प्रत्येकाने लिहिले की जब्या हा खालच्या जातीचा , शालू ही वरच्या जातीची आणि जब्याला ती आवडत असते.परंतु वातावरण आणि जाती वादाबद्दल या चित्रपटात भरपूर काही भेटेल. शेवटी जेव्हा त्याची बहीण ,वडील ,आई असं सगळं कुटुंब शाळे जवळ डुक्कर पकडण्यासाठी जात असतं तर जब्या ला माहिती असते आता शाळा सुटतात .आणि मी जर डुक्कर पकडायला गेलो तर सर्व शाळेतील मुला मुली मला पाहून हसणार ,मला चिडवणार, आणि याचीच त्याला प्रचंड लाज वाटेते. स्वतःची ,त्याच्या व्यवसायाची आणि इतर गोष्टींची जब्या नेहमी त्याच मन त्याला सांगत असतं तू खालच्या जातीचा आहे. परंतु यामध्ये कोणत्याही समीक्षकांनी जब्याच्या बहिणीकडे जास्त लक्ष दिलेले दिसत नाही कारण ती एक स्त्री आहे म्हणून.....

                             तिच्या हातावर तर मेहंदी लागलेली होती .तिला नसेल वाटली का  लाज त्याला विचार आपण करायला हवा. कशाला जायचं तिकडे या सगळ्या गोष्टी चा   विचारसुद्धा करत नाही. म्हणजेच याचा अर्थ ती भावनिक तर आहेच परंतु एक स्त्री म्हणून  ती खूप कणखर आहे .आणि हीच माहिती कुठे पाहायला मिळाली  नाही .हे कोणत्याही समीक्षकांनी का लिहिलं नसावं कृषिप्रधान संस्कृतीला वाढवण्यामध्ये स्त्रीचा वाटा आहे. हे आपण विसरलो..

              - Kunal Mayavati Dattu Paithane 

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚