गौरी लंकेश
गौरी लंकेश यांचा जन्म 29 जानेवारी 1962 रोजी बंगलुरु येथे झाला .त्या बंगलोरच्या पत्रकार आणि कार्यकर्त्या होत्या. त्यांचे वडील पी. लंकेश यांनी सुरू केलेले "लंकेश पत्रिका "या साप्ताहिकांमध्ये त्यांनी संपादक पदाची धुरा सांभाळली.
गौरी लंकेश यांनी आपल्या करिअरची सुरुवात टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रापासून केली. त्यानंतर त्यांनी "संडे मासिक" मध्ये बातमीदार म्हणून काम पाहिले. इनाडू या तेलगू वृत्तवाहिनीसाठी देखील त्यांनी काम केलं .आयुष्याची सोळा वर्षे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात भ्रमंती केली.
गौरी लंकेश या उजव्या विचारसरणी मधील हिंदुत्वाच्या राजकारणाच्या कट्टर समीक्षक होत्या. हिंदूधर्म हा धर्म नसून समाजातील पदानुक्रमाची व्यवस्था आहे .ज्यामध्ये स्त्रियांना दुतीय श्रेणीतील प्राणी मानले जाते. स्त्रियांना कायमच कमी लेखलं गेलंय. अशा प्रखर शब्दांमध्ये त्यांनी वेळोवेळी टीका देखील केली .जी अनेक समाजकंटकांच्या जिव्हारी लागली .पण गौरी लंकेश एवढ्यावरच थांबल्या नाहीत. तर त्यांनी सत्यशोधकीय पद्धतीने आणि विचाराने पत्रकारिता करत आपले काम चालू ठेवले .5 सप्टेंबर 2017 बंगळुरू मधील राज राजेश्वर नगरा मधील त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून त्यांची हत्या केली गेली .कारण त्या हिंदू जहाल मतवादी लोकांवर टीका करत होत्या .सोबतच हिंदुत्ववादी आणि जातीवादी विचारांच्या विरुद्ध लिखाण करून त्या आवाज उठवत होत्या.
अनेक राजकीय विश्लेषकांनी गौरी लंकेश यांच्या हत्येला "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ" जबाबदार असल्याचे म्हटले आहे .राजकारणातील उजव्या विचारसरणीच्या विरोध करणाऱ्या लोकांसाठी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या गौरी लंकेश म्हणून त्यांची ओळख आहे..
- Kunal Mayavati Dattu Paithane
Comments