विकास शेतीचा
शेती ही मानवी जीवनातील फार महत्त्वाची गोष्ट आहे .इंद्रजीत भालेराव यांनी लिहून ठेवले ना" माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा "म्हणजे पालन पोषण करणारा किंवा सांभाळणारा कोरोना काळात संपूर्ण जगातील काम धंदे जवळपास ठप्प होते .फक्त आपत्कालीन कामे सोडून मोठमोठे उद्योग देशो-धडीला लागले. अनेक माणसांचे जीव या महामारी मध्ये गेले. दिवस काढण्यासाठी ज्या अन्नधान्याची गरज लागते ते सुद्धा वेळप्रसंगी अनेकांना मिळालं नाही. संपूर्ण जगाचा व्यवसाय ठप्प असताना फक्त एकच व्यवसाय सुरू होता आणि तो म्हणजे शेती.
कोरोना काळात शेतकऱ्याचं आणि शेतीचं महत्व अनेकांना कळालं आणि संपूर्ण जगाला ही कळून चुकलं होतं की , उभ्या जगाला पोसणारा हा फक्त आणि फक्त शेतकरीच आहे.
भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु आजही तो जगाच्या तुलनेत खूप मागे आहे. इजराइल सारख्या छोटासा देश शेतीमध्ये नंबर एकला आहे तर तो का पुढे आहे तर तिथे आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते .आणि भरपूर उत्पन्न आणि नफा मिळवला जातो. हे सगळं शक्य होतं. संशोधनामुळे आणि हे संशोधन होतं विद्यापीठांमध्ये पण आपल्याकडे आपल्याकडे विद्यापीठ फक्त आणि फक्त नावालाच आहे आतापर्यंत शेतकरी सुखी होईल अशा संशोधनाची गरज आपल्या कृषी विद्यापीठांना आहे.. !
- KUN@L
Comments