Posts

Showing posts from March, 2022

सिनेमा प्लॅन

               🌅 उन्हाळा जवळ आला होता. मित्रांच्या हट्टापाई आम्ही भर दुपारी खरेदी करण्यासाठी चार -पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या औरंगपुऱ्याच्या मार्केट मध्ये 👣पाई चालत गेलो होतो. उन्हाने अंगाची फार लाई -लाई होत होती. सकाळी लवकर उठल्यामुळे झोपही येत होती. तरी आम्ही आमची खरेदी आटपून चार वाजता आमच्या रूम वर पोहोचलो.       गावाकडे गेलेला मित्र येणार होतो. आणि तो ही आमच्या पाठोपाठ आला. अगोदर ठरल्याप्रमाने आता खूप थकलो असल्या कारणाने बाहेर कोठेही जायचं नाही. अगदी Reading ला सुद्धा! आता फक्त आराम करायचा होता.         एखांदा तास भर झाला असेल. आमच्या मधील एकाला पिक्चर बघायला जायचा प्लॅन सुचला. 'पावनखिंड' बघुया सगळ्यांनीच त्याला होकार दिला.पण मी म्हटलं उद्या जाऊ आज खूप थकलोय. तरीही यांचा हट्ट होताच मीही होकार दिला.        पण ही गोष्ट इथेच संपत नाही तर येथून खरी चालू झाली. जायचं ठरलं! पण पैसे नाही, थेटर कोठे आहे तेही माहिती नाही. कारण आम्ही औरंगाबाद मधील एकाही थेटरला गेलोच नाही. काहींनी तर थेटर मध्ये आ...