बलात्कार

                           बलात्कार या शब्दांनीच माणसाचा मन हे हेलावून निघते.. तर आपण विचार करू शकतो .की, ज्यांच्यावर हा होतो त्यांचा किती यातना सहन कराव्या लागत असेल ,आयुष्यातलं संपूर्ण सुख या घटनांनी कायमचं हे हिरावल जातं. पण समाजात वावरायला सुद्धा एक प्रकारची बंधने येतात. आणि ही बंधने येऊन देण्याचे कष्ट आरोपी बलात्कारी चांगल्या पद्धतीने घेतात. पहिले तर तिच्या अब्रूचे लचके तोडले जातात .आणि ती कोणाला सांगू नये म्हणून तिला ठार केल्या जाते.

                        इतकी भयानक परिस्थिती आपल्या देशात आणि जगात सध्या आहे. ज्यावेळी एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो तिच्या सुदैवाने ती वाचते तेव्हा ती नरक यातनेला सामोरे जात असते .तिची स्थिती अशी असते की ती तिच्या आई-वडिलांना सुद्धा कधी कधी सांगू शकत नाही की ,माझ्यावर बलात्कार झालाय हे घरी जरी कळाले तरी या समाजाच्या भीतीने तेही कोणाला सांगण्याचे धाडस सुद्धा करीत नाहीत. ते सर्व कुटुंब असल्यास स्वतःला संपविण्याचा प्रयत्न करीत असतं. पण अशातच अनेक वेळा जिच्यावर बलात्कार झाला आहे ती डिप्रेशन मधून बाहेर पडूच शकत नाही .आणि ती आत्महत्या करते.

                          पण आत्महत्या करून आपण आपले जीवन संपवू.. पण शेवटी त्रास हा आपल्या आई-वडिलांना होतो .आणि आरोपी मुक्त फिरत असतात... दुसरी "निर्भया " शोधायला....

                          अशा परिस्थितीत जर एखाद्या स्त्रीवर बलात्कार झाला असेल तर तिला मानसिक आधार द्या .पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा .आणि त्या आरोपींना कडक शिक्षा होईपर्यंत हार मानू नका .आणि न्यायालयाने सुद्धा गुन्ह्याची गंभीरता समजून घेऊन आणि मानसिकतेच्या माणुसकीच्या दृष्टीने कायद्याचे पालन करून निर्णय दिला तर बरं होईल... सोबतच पत्रकारांनी ही तिची बदनामी होईल असा आशय जसे नाव ,गाव ,ठिकाणी यांसारख्या बाबी टीआरपीच्या आणि प्रसिद्धीच्या नादात उघड करू नये...

                             जेणेकरून ती पुन्हा ताठ मानेने उभी राहिली पाहिजे. आपल्या सोबत जे झालं ते इतर कोणत्याही कोणासोबतही होऊ नये यासाठी ती लढू शकेल. कारण शेवटी  स्त्री ही प्रत्येकाच्या घरात आहे .कोणासाठी ताई तर कोणासाठी आई अशा महत्वपूर्ण भूमिका ती पार पाडणारी कुटुंबाची भाग्यलक्ष्मी असते. म्हणून तिला आयुष्यभर  जपा.....!


              - Kunal Mayavati Dattu Paithane 

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚