बरखा दत्त

                  बरखा दत्त यांचा जन्म 18 डिसेंबर 1971 मध्ये दिल्ली येथे झाला. त्यांचे वडील पी दत्त हे एअर इंडियाचे अधिकारी होते .तर त्यांच्या  आई प्रभा दत्त या हिंदूस्थान Times च्या प्रसिद्ध पत्रकार होत्या .त्यांची धाकटी बहीण देखील सीएनएन आयबीएन साठी काम करणारी दूरदर्शन पत्रकार आहे .म्हणजेच लहानपणी त्यांना त्यांच्या आईकडून पत्रकारितेचे बाळकडू मिळालं.

                         बरखा दत्त यांनी इंग्रजी साहित्यामध्ये सेंट स्टीफन कॉलेज ऑफ दिल्ली येथून पदवी प्राप्त केली .तसेच जामिया मिलिया इस्लामिया मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर दिल्ली येथे मास्तर पूर्ण केले .पण त्या इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ जर्नलिस्म , न्यू यॉर्क मधून पत्रकारिता  पद्युत्तर पदवी देखील संपादित केली..

                   बरखा दत्त यांनी आपल्या करिअरची सुरुवात एनडीटीव्ही मधून केली .आणि नंतर त्यांनी संस्थेच्या इंग्रजी वृत्त शाखेच्या प्रमुख पदी सुद्धा काम पाहिले .जवळपास त्यांनी 21 वर्ष त्यांनी या मध्ये घालवली .पण त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती भारत पाकिस्तान कारगिल युद्धामुळे या काळात त्या उभारत्या पत्रकार म्हणून उदयास आल्या..

                          कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या मुलाखतीसह 1999 मधील कारगिल संघर्षाच्या अहवालामुळे त्यांना भारत भारतात प्रसिद्धी मिळाली .त्यानंतर त्यांनी काश्मीर पाकिस्तान अफगाणिस्तान आणि इराक मधील संघर्ष त्यांनी कव्हर केले आहेत.

                     बरखा दत्त यांच्या अतुलनीय कामगिरीमुळेच त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत .ज्यामध्ये पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मानाचा समावेश आहे.....!


              - Kunal Mayavati Dattu Paithane 

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚