सत्तेसाठीचा सर्वे
आतापर्यंत आपण अनेक सर्वे बघितले असतील. किंवा आपल्याकडे सर्वे वाले कोणतरी नक्कीच येऊन गेले असणार. परंतु या सर्वेचा आणि विकासाचा काय संबंध? तर सांगतो.
सर्वे म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीचा अंदाज वर्तविणे होय. आपल्या इकडे निवडणुकांच्या वेळी मोठ्या प्रमाणात सर्वे केले जातात. मग ती ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो ,महानगरपालिका असो वा आमदारकीच्या निवडणुका असो हे सर्वे फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे केले जात आहे.
आपल्याकडे ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आहेत. त्या निमित्ताने हा सर्वे सगळीकडे सुरू आहे. बहुतांश वेळा सर्वे हा खाजगी एजन्सी मार्फत केल्या जातो. कोणी सर्वे दिल आहे किंवा किती पैशात दिलाय किंवा सर्वे करणारे कोणामार्फत आले आहेत या सर्व गोष्टी गुप्त ठेवल्या जातात. ज्या गावचा सर्वे आहे त्या गावात बहुतांश वेळा सर्वे हा त्या गावातील कोणीतरी व्यक्ती एजन्सीला देत असतो. तर कधी आमदारही देतात. पण या गोष्टीची गुप्तता बाळगली जाते.
सर्वे केल्या जातो . पॉईंट काढले जातात. जो काय अंदाज निघाला तो त्या व्यक्तीपर्यंत पोहोचविला जातो. जर समजा एखादा सरपंच पदासाठी उभा राहिला मतदान लागलीच काही दिवसांवर येऊन ठेपले. फॉर्म वगैरे सगळं भरून झाले .जोरात तयारी सुरू आहे. तरी मी एखाद्या एजन्सीला सर्वे दिला. सर्वेच्या निकालामध्ये कळालं की, मी जिंकू शकत नाही तेव्हा गेम पालटण्यासाठी पण प्रयत्न केले जातात .वेळ प्रसंगी सत्ता सुद्धा काबीज केली जाते . आणि हाच उद्देश सर्वे करण्यामागचा असतो.
- Kunal Mayavati Dattu Paithane
Comments