आधुनिक तंत्रज्ञान मोबाईल फोन......... पत्र पाठवले जायचे.सुलतानाच्या काळात तर कबुतराच्या माध्यमातून पत्रव्यवहार चालायचा . कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून द्यायची अन् फक्त त्याला सांगायचं कोणाला द्यायच ते बरोबर त्या व्यक्तीपर्यंत आणून पोहोचवत . नंतरच्या काळात पोस्टमार्फत पत्र आपल्यापर्यंत येऊन पोहोचू लागली .परंतु ती खूप वेळ खाऊ पद्धत होती. कारण आपण आज पाठवलेलं पत्र चार आठ दिवसानंतर मिळायचं पण वाट पाहण्यात मजा होती. त्या पत्राची ओढ असायची. परंतु काळ सरत गेला आणि मोबाईलचे युग अवतरलं .त्यामध्ये त्याला हवं त्याला क्षणार्धात पत्र पाठवता येऊ लागलं .कॉलिंग ,मेसेजिंग ,कॅमेरा यांसारख्या मल्टीमीडियाचा त्या मोबाईल मध्ये समावेश होत गेला. आता तर मोबाईल ने प्रचंड प्रचंड मोठी भरारी घेतली आहे .कारण प्रत्येकाकडे मोबाईल फोन आले आहेत .सेकंदाच्या आत आपल्याला हवी ती माहिती गुगलच्या माध्यमातून मिळवता येऊ शकते. ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. पैशाचे व्यवहार देखील आपण फोनच्या माध्यमातून करू शकतो. विधीन सेकंद आपण जगापर्यंत पोहोचत असतो .आणि ताजी अपडेट क्षणाला द मिळवत असतो .अशा पद्धतीने फोन मुळे एक क्रांती झाली आहे. पण माणूसपण मात्र विसरला आहे .माणूस इतका मोबाईलचा आहारी गेलाय की, तो त्यामध्ये कायम गुंतलेला असतो .चार चौघात असताना देखील तो मोबाईल मध्येच असतो .पूर्वी माणसं चार चौघात असले की मस्त गप्पा गोष्टी व्हायच्या पण आता आमचा हा संवाद थांबला आहे...
तंत्रज्ञानाने मानवाच्या जगण्याची परिभाषा बदलून टाकली आहे .पहिले पत्र पाठवले जायचे.सुलतानाच्या काळात तर कबुतराच्या माध्यमातून पत्रव्यवहार चालायचा . कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून द्यायची अन् फक्त त्याला सांगायचं कोणाला द्यायच ते बरोबर त्या व्यक्तीपर्यंत आणून पोहोचवत . नंतरच्या काळात पोस्टमार्फत पत्र आपल्यापर्यंत येऊन पोहोचू लागली .परंतु ती खूप वेळ खाऊ पद्धत होती. कारण आपण आज पाठवलेलं पत्र चार आठ दिवसानंतर मिळायचं पण वाट पाहण्यात मजा होती. त्या पत्राची ओढ असायची. परंतु काळ सरत गेला आणि मोबाईलचे युग अवतरलं .त्यामध्ये त्याला हवं त्याला क्षणार्धात पत्र पाठवता येऊ लागलं .कॉलिंग ,मेसेजिंग ,कॅमेरा यांसारख्या मल्टीमीडियाचा त्या मोबाईल मध्ये समावेश होत गेला.
आता तर मोबाईल ने प्रचंड प्रचंड मोठी भरारी घेतली आहे .कारण प्रत्येकाकडे मोबाईल फोन आले आहेत .सेकंदाच्या आत आपल्याला हवी ती माहिती गुगलच्या माध्यमातून मिळवता येऊ शकते. ऑनलाईन शॉपिंग करू शकतो. पैशाचे व्यवहार देखील आपण फोनच्या माध्यमातून करू शकतो. विधीन सेकंद आपण जगापर्यंत पोहोचत असतो .आणि ताजी अपडेट क्षणाला द मिळवत असतो .अशा पद्धतीने फोन मुळे एक क्रांती झाली आहे.
पण माणूसपण मात्र विसरला आहे .माणूस इतका मोबाईलचा आहारी गेलाय की, तो त्यामध्ये कायम गुंतलेला असतो .चार चौघात असताना देखील तो मोबाईल मध्येच असतो .पूर्वी माणसं चार चौघात असले की मस्त गप्पा गोष्टी व्हायच्या पण आता आमचा हा संवाद थांबला आहे...
- Kunal Mayavati Dattu Paithane
Comments