बंधन तोडीत यावं....

                               प्रत्येक स्त्री ही स्वतंत्र असते. जेव्हा ती "नाचते" तेव्हा ती समाजाने लादलेल्या बंधनातून ती मुक्त होत असते... आणि प्रत्येक ठिकाणी पुरुषी वर्चस्वाचा उधो - उधो करणाऱ्या समाजाला आणखी ती समजलीच नाही. तीही तुमच्या आमच्या सारखी एक माणसाचं तर आहे. मग सगळे कामे तिनेच का करायची.??? ती मुलांना शाळेला , नवऱ्याला ऑफिस ला, जाण्यासाठी तीची चाललेली धावपळ यासारखी अनेक कामे ती दिवसभरात करत असते. आपल्या कुटुंबासाठी ती राब- राब राबत असते. सगळ्याची काळजी घेते, तरी सुध्धा आपण म्हणतो तू काय करते घरीच तर असते दिवसभर फक्त टीव्ही बघत.. पण आपण हे विसरतो की, ती आपल्यासाठी किती झिजली आहे.. आपल्यासाठी ती रात्रीचा दिवस करते. हे आपण समजून घेतले पाहिजे.....

     जी तुमची आवडती व्यक्ती असते. तिला तुम्ही किती जीवापाड जपता . तिची काळजी घेता. वेळप्रसंगी तिला समजून सुध्धा घेता..पण जर तिने पुरुषी मानसिकतेला किंवा पुरुषी वर्चस्वाच्या विरुद्ध जर काही केले तर एका क्षणात तिला नजरेतून उतरवता अस का???? 

जी तुम्हाला समजून घेत असेल ना तिला संपूर्ण स्वातंत्र्य द्या, तिच्या मनाप्रमणे जगण्याचं, बोलण्याचं, मुक्त पणें वावरण्यचं.....

कारण ती ना खूप भारी असते. तिला जातीपातीच्या आणि या समाजव्यवस्थेच्या बंधनातून मुक्त करा... आणि मनसोक्त जगा आपले आयुष्य, आणि आयुष्यभर प्रत्येक वळणावर तिच्यासोबत ठाम उभे रहा .. कारण "ती जरी नतमस्तक होत असली तरी ती निस्वार्थ प्रेमासाठी सर्व काही उधळून लावते".... 

   आणि अशीच माणसं माझ्या आयुष्यात मला हवी आहेत. ज्यानं फक्त माणुसकी कळते, प्रेम कळते, आणि माणसं जपायला आवडतं.... !

                                           - Kun@L

Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚