सुगंधी बाग आहे ती
आज सकाळी 5 वाजता उठलो. आणि आवरून रस्त्याने चालत होतो. परंतु जेव्हा मी उठलो ना तेव्हा एका क्षणात मी टीम तरुणाई ने आपल्याला दिलेल्या, निर्माण केलेल्या विश्वात गेलो. त्या सर्व गोष्टी आठवत होत्या. सकाळी पाचला उठणे, फ्रेश होणे , काढा घेणे या सर्व गोष्टी आठवतच होत्या .तेवढ्यात समोरून मित्र आले .आणि आम्ही फुल मार्केटमध्ये गेलो .कारण उद्या सहा जानेवारीला पत्रकार दिन असल्यामुळे आमची तयारी आजपासून सुरू झाली होती . तिथे अनेक प्रकारचे फुल दिसली झेंडू ,शेवंती गुलाब ,मोगरा यांसारखी अनेक फुले तिथे होती. आणि हे सगळं बघून मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची आठवण झाली. त्या विश्वात आपण खरंच किती खुश होतो. ते आयुष्य आपण किती मनमुरादपणे जगलो .एकमेकांना फुल देणं ,कधी चाफा दिला ,तर कधी आणखीन कुठल्यातरी फुल दिलं. भावना मात्र एकच होती प्रेम, आपुलकी ,जिव्हाळा पण जेव्हा मी फुल मार्केटमध्ये गेलो ना तेव्हा त्या सगळ्या फुलांमध्ये मला तुम्हीच दिसत होता. ते फुलं मला तुमची आठवण क्षणाक्षणाला करून देत होते. फुल घ्यायचे पण घेऊ कोणासाठी ?कोणाला द्यायचे? कोण म्हणेल मला काय गिफ्ट देशील? हे सर्व मला तिथे आठवत होतं. शरीराने जरी मी येथे असलो ना , तरी आजही मनाने तुमच्याच सोबत आहे. तुमच्या हृदयात आहे....!
काल सकाळी जेव्हा मी मेस वर जेवायला गेलो होतो .तेव्हा अविनाश होता सोबत मी त्याला आणि माझ्या बाकीच्या मित्रांना प्रेमाआहार भरवला . त्यांना माहिती नाही कसं वाटलं .पण मला छान वाटलं .असं वाटत होतं की मी तुम्हालाच भरवतो....
डिपार्टमेंट मध्ये गेल्यावर फक्त कामापुरता इतरांना बोलणारा मी प्रत्येकाकडे गेलो .त्यांची विचारपूस केली कशा आहात ?बरे आहात ना? प्रेमाने आणि आपुलकीने विचारले हे सगळं बघून ते म्हणाले ,तू खरच बदलला यार मला माहिती नव्हतं मी बदललो का नाही. पण ते म्हणत होते .मी त्यांना सांगितलं प्रेम म्हणजे काय असतं. मैत्री सारख सुंदर प्रेम या जगात दुसरं कोणतच नसतं ...सोबतच comfort zone मधून बाहेर पडा जग खूप मोठ आहे. आपण प्रत्येकाशी बोललं पाहिजे .हे जेव्हा मी त्यांना सांगितलं ना ते पुन्हा एकदा म्हणाले तू खरच बदलला...
हे सर्व घडत असताना मॅडम- सर यांचे लेक्चर सुरू झाले .मग मी जेव्हा जेव्हा शांत असतं, जेव्हा मी बोलत नसतं. तेव्हा -तेव्हा मी क्षणाक्षणात आपल्या प्रेमाच्या ,आपुलकीच्या ,माणुसकीच्या विश्वात प्रवेश करीत असे. आणि परत सगळ्यांना आठवत असे. आजही आंघोळ करायला जरी गेलो ना तिथे सुद्धा तुम्हा सर्वांची आठवण येते जिथे -जिथे मी एकटा असतो .तिथे तुम्ही सर्व क्षणार्धात माझ्यासोबत येतात .पुन्हा एकदा आपल्या विश्वात रमायला, प्रेम करायला.... भाग पाडतात .
Comments