14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚
14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚
प्रेम
❤️प्रेम म्हणजे एका सुंदर संकल्पनेचा जन्म ज्यामध्ये आयुष्य, निसर्ग ,माणुसकी अशा गोष्टी दडलेल्या आहेत. आणि याच प्रेमाणे आपलं आयुष्य समृद्ध, सुंदर आणि सुखकर केलं आहे ..कारण प्रेम म्हणजे माणूस बनण्याची प्रक्रिया ..!आणि प्रेमाचा दिवस म्हणून आपण 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करत असतो.
जे प्रेम आपण माणसांवर करतो. तेच प्रेम आपण निसर्गावर या पर्यावरणावर करूया .ज्याने फक्त आतापर्यंत आपल्याला भरभरून दिलं. मायेची सावली दिली ,तहान भागवण्यासाठी पाणी दिलं, जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन, तर स्वच्छंदी आयुष्य जगण्यासाठी निरभ्र आकाश दिले... हे सर्व -सर्व काही त्याने आपन न मागता आपल्याला दिलय...
पण माणूस म्हणून आपण त्याला काय दिलं काहीच नाही ना??? उलट कचरा ,प्लास्टिक, प्रदूषण यासारख्या गोष्टीचा वापर करून आपण त्या निसर्गात फेकून दिल्या. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आपणच करत आहोत .पण हे कुठेतरी थांबायला हवं. आणि म्हणूनच "टीम तरुणाईच्या" माध्यमातून यावर्षीपासून आम्ही💚 "ग्रीन व्हॅलेंटाईन डे" 💚सेलिब्रेट करायचं ठरवलं आहे .म्हणजेच आपलं जसं माणसांवर प्रेम आहे .तसंच आपण या निसर्गावर प्रेम करूया ..यासाठी आम्ही दिनांक ५ फेब्रुवारी रविवार ला सकाळी ६:३०ते १० या वेळेत हिमायत बाग औरंगाबाद या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवतोय. यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे.
आम्ही तर चाललोय .....
तुम्ही पण या .....
निसर्गावर प्रेम करण्यासाठी
ग्रीन Velentine day सेलिब्रेट करण्यासाठी... 💚
Thank you..
Comments