समृद्धी महामार्गाच्या पलीकडे

          मुंबई ते नागपूर या शहरांना जोडणारा महामार्ग म्हणजे समृद्धी महामार्ग होय. हा महामार्ग 701 किलोमीटर लांबी असणारा आहे. पहिले मुंबईवरून नागपूरला जाण्यासाठी 14 ते 15 तास लागायचे परंतु समृद्धी महामार्गामुळे हे अवघ्या सात ते आठ तासांवर येऊन ठेपलं आहे. 

        समृद्धी महामार्ग बनविताना आलेल्या बहुसंख्य अडचणीवर मात करत रस्ता तयार करण्यात आला आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, शेती गेली आहे, गावच्या- गाव स्थलांतरित करावी लागली आहेत, अनेकांचे हॉटेल ,रेस्टॉरंट आणि जवळपास महत्त्वाचे ठिकाणे  या महामार्गामध्ये गेली आहेत. परंतु या सगळ्या बाबींच्या बदल्यात त्यांना त्याचा मोबदला अर्थातच पैसे मिळाले आहेत. काही ठिकाणी तर पाच पट पैसे देऊन  जमीन मिळविली आहे. त्यामुळे शेतकऱ्याना ही काही वाटलं नाही. अनेकांची तर इच्छा होती माझ्या शेतातून समृद्धी महामार्ग जायला हवा. कारण त्यांना माहिती होतं. आपल्या सात पिढ्यांनी जरी शेती केली ना तरी एवढे पैसे मिळणार नाहीत. आणि ज्यांनी या प्रकल्पाला  विरोध केला त्यांची तोंड बंद करण्यात आली. 

        या सर्व बाबी घडत असताना आपण या वर्षांनुवर्षे  अभिमानाने उभ्या असणाऱ्या झाडांचा विचार कधी केलाय का? सरकार म्हणेल तेवढ्या झाडांची कत्तल झाली. त्यापेक्षा काही "पट" झाडे आपण लावू आणि संवर्धन करू...परंतु समृद्धीच्या नावाखाली तुम्ही असंख्य झाडांची हत्या केली. त्याचं काय? असंख्य पिला- पाखरांची घरचं काय? तर आयुष्य उध्वस्त केली. त्यांचा विचार देखील शासनाने केला का नाही.. माणसांसाठीच मानवी अधिकार का आहेत? तर  आपण बोलतो म्हणून पक्षी, झाडे बोलू शकत नाहीत,  म्हणून त्यांच आयुष्य संपून त्यांना देशोधडीला लावनं कितपत योग्य आहे. याचा विचार माणसाने करायला हवा होता. 

        त्यांच्यासोबत जे झालं ते फारच निंदनीय  होतं. माणूसकीच्या नात्यातून आपण त्यांच्याकडे पाहायला कमी पडलो. परंतु आता तरी जे काही आपल्याला निसर्गाने दिलेले प्राणी, पक्षी, झाडे शिल्लक आहेत तेवढी वाचवली पाहिजेत.सोबतच नवीन झाडे लावून त्यांचे संवर्धन सुद्धा केले पाहिजे...!

                                 - KUN@L PAITHANE

                                           


Comments

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚