" शेतकरी जगला पाहिजे ".
" शेतकरी जगला पाहिजे ".
शेतकऱ्याचा दुःखामध्ये तल्लीम होऊन शेतकऱ्याच्या कष्टाच्या घामाच्या मूल्याची व्यथा मांडणारे शब्द तमाम कष्टकरी शेतकरी मायबापास अर्पण...!
हजारो वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावावर मानवाची निर्मिती झाली. तो चार पायांचा दोन पायांवर उभा राहून राहून चालू लागला. जंगलामध्ये एकटा राहणारा माणूस समूह करून राहू लागला. त्याला चाकाची कला अवगत झाली. त्याने आगीचा शोध लावला. हत्यारे बनविली ,कच्चे मास भाजून खाण्यास सुरुवात केली. आणि जवळच असलेल्या पडीत जमिनीस करण्यास सुरुवात केली. आणि येथूनच सर्वप्रथम कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतीची सुरुवात झाली. आणि तिने जी गती पकडली ती कायमची कधीही न थांबण्यासाठी, माणसाच्या विकासासाठी, माणूस जगविण्यासाठी,ऊन- वारा -पाऊस, सारं काही सोसून माणसाला माणूसपण बहाल करण्यासाठी..!
शेतात चांगलं पिकतं तेव्हाच बाजारात विकतं असे म्हणतात. परंतु शेतात कितीही चांगलं जरी पिकलं तरी भाव ठरविणारे शेतकरी कोण? त्यासाठी आहे ना सरकार...! ते जो भाव ठरवतील त्या भावात विकावं लागतं यामध्ये शेतकऱ्यांचा बऱ्याचदा फायदा कमी पण घाटात जास्त असतो. या पद्धतीने जर शेतकरी शेतातील माल विकत राहिला तर हा घट्याचा करावा लागणारा व्यवसाय आहे. परंतु जर स्मार्ट पद्धतीने केला तर चांगले पैसेही मिळवून देणारा व्यवसाय आहे. जसे की दलालाच्या मदतीने माल न विकता थेट ग्राहकाला जर "भाजीवाले डॉट कॉम" यांसारख्या वेबसाईटच्या मदतीने जर ग्राहकांना थेट माल विकला तर शेतकऱ्यांनाही चांगला भाव भेटेल. ग्राहकांनाही अर्थातच ज्याने तो खरेदी केला आहे त्याला बाजारभावापेक्षा कमी भावात पडेल. आणि तोही इतरांपेक्षा कमी भावात विकून चांगला नफा मिळवेल. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी काय शेतकरी आणि ग्राहकांमधली दलाली आहे ती थांबेल. आणि दोघांचेही पैसे वाचतील....
शेतकऱ्याने जर थेट हॉटेल मालकालाच आपला माल विकला तर तसेही हॉटेल वाल्यांना दररोज भाजीपाल्याची गरज तर पडते. आणि ती भागविण्यासाठी ते बाजारातून भाजीपाला आणतात. असे न करता ओळखी वाढवून थेट हॉटेललाच दररोज आपला माल बाजार भावापेक्षा थोड्या कमी किमतीत आणि शेतकऱ्याला आणि उपभोक्त्याला फायदा होईल अशा किमतीत जर माल विकला तर तो हॉटेलवाला कशाला बाजारात जाईल. तुमच्याकडूनच घेईल की, फक्त शेतकऱ्यांनी एवढी काळजी घ्यावी की आपला माल चांगल्या दर्जाचा असावा...
पूर्वी शेतात आतापेक्षा चांगलं आणि उत्तम दर्जाचं उत्पादन व्हायचं. आणि भाव हि बऱ्यापैकी मिळायचा.परंतु काळाच्या ओघात सारं चित्र पालटलयं अन् गावपण हरवल्यान माणूस पण गारथलंय अशी शेतकरी राजाची व्यथा झाली आहे...
आताच्या शेतात जे पिकतं ते संपूर्ण रसायनिक खत, औषध फवारणी अशा रसायनजन्य औषधांपासून 100% शेतीमध्ये 75 टक्के रसायनाचा वापर शेतीत होतो तर 25 टक्के शेतीमध्ये फक्त सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून सेंद्रिय शेती केली जाते. जी सर्वांसाठी उपयुक्त फायदेशीर आणि दर्जेदार आहे. परंतु याकडे अजूनही दुर्लक्षच आहे. कारण येथे नैसर्गिक पद्धतीने सर्व गोष्टी कराव्या लागतात. अर्थातच रसायनजन्य खाता ऐवजी प्राण्यांचे मलमूत्र यापासून निर्माण होणाऱ्या खतांचा अवलंब करावा लागतो. यांसारख्या अजूनही काही गोष्टी या शेतीमध्ये कराव्या लागतात. आणि म्हणूनच या शेतीपासून 70 ते 75 टक्के शेतकरी वर्ग अजूनही दूर आहे.
शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे. जेणेकरून जमिनीचा पोत सुधारेल. आणि उत्पादन अधिक प्रमाणात मिळेल. सोबतच चांगला प्रतिसाद आणि चांगला भावही त्याच्या मालाला भेटेल. जेणेकरून शेतकरी जगला पाहिजे. त्याच्या मालाला चांगला हमीभाव भेटला पाहिजे. मधली दलाली थांबून शेतकऱ्याला हव्या त्या ठिकाणी आपला माल विकता यायला पाहिजे. यासाठी सरकारने काही उपाययोजना ही करायला हव्या..
आताच्या काळातील सरकारने फक्त आश्वासने न देता शिवकालीन शेतीसाठी शिवरायांनी केलेल्या उपाय- योजना शेतकऱ्याला जमीन देणे, बैल जोडी देणं,अवजारे देणं, आणि वेळप्रसंगी संपूर्ण शेतसारा माफ करणे. यातील एक तरी आताच्या सरकारने केलं तरी शेतकऱ्याची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारेल. तो सन्मानाने जगेल. आयुष्य आणि शेती गहाण न ठेवता तो जगेल. कारण शेतकरी जगला तरच आणि तरच जग जगेल....!
कुणाल पैठणे
9021764017
paithanekunal@gmail.com
Comments