सिनेमा प्लॅन

               🌅 उन्हाळा जवळ आला होता. मित्रांच्या हट्टापाई आम्ही भर दुपारी खरेदी करण्यासाठी चार -पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या औरंगपुऱ्याच्या मार्केट मध्ये 👣पाई चालत गेलो होतो. उन्हाने अंगाची फार लाई -लाई होत होती. सकाळी लवकर उठल्यामुळे झोपही येत होती. तरी आम्ही आमची खरेदी आटपून चार वाजता आमच्या रूम वर पोहोचलो.
      गावाकडे गेलेला मित्र येणार होतो. आणि तो ही आमच्या पाठोपाठ आला. अगोदर ठरल्याप्रमाने आता खूप थकलो असल्या कारणाने बाहेर कोठेही जायचं नाही. अगदी Reading ला सुद्धा! आता फक्त आराम करायचा होता.
        एखांदा तास भर झाला असेल. आमच्या मधील एकाला पिक्चर बघायला जायचा प्लॅन सुचला. 'पावनखिंड' बघुया सगळ्यांनीच त्याला होकार दिला.पण मी म्हटलं उद्या जाऊ आज खूप थकलोय. तरीही यांचा हट्ट होताच मीही होकार दिला.
       पण ही गोष्ट इथेच संपत नाही तर येथून खरी चालू झाली. जायचं ठरलं! पण पैसे नाही, थेटर कोठे आहे तेही माहिती नाही. कारण आम्ही औरंगाबाद मधील एकाही थेटरला गेलोच नाही. काहींनी तर थेटर मध्ये आतापर्यंत सिनेमाचं पहिला नव्हता. त्यांचा तो फर्स्ट टाईम होता.
         तरीही सिनेमाला जाताना आम्हला ज्या अडचणी आल्या त्यावर मात करून सिनेमाला जायचं पक्क झालं. मग प्रश्न होता तिकीट किती असेल? कारण आम्ही आतापर्यंत गावाकडे असताना तालुक्याच्या ठिकाणी थेटर मध्ये पिक्चर बघितले. तिथे रेट खूप स्वस्त आणि मस्त असायचे. ४० ते ६० त्यामुळे आम्हाला तिकडले भाव माहिती पण इथले नाही.
       आमच्यातील एकजण काही दिवसापूर्वी पिक्चर बघण्यासाठी गेला होता. पण बघितला नाही. मग त्याने आम्हला सांगितलं, १०० ते ११० पर्यंत असतं . पैशाचं नियोजन बघून सगळे तयार झाले. पैसे कोणाकडेच राहिले नव्हते. जे होते ते घरभाडे देण्यापूर्तेच होते फक्त...! मग गावावरून आलेला मित्राला आम्ही काही उसने पैसे दिले होते. तो म्हणाला मी काढतो तुमचे तिकीट चला.. But त्याने पहिलेच आम्हला सांगितले होतं की, माझ्याकडे ५०० रुपये आहेत बाकी तुम्ही टाका. त्यावेळी हो म्हटलं, आम्ही विचार केला. ५०० याच्याकडे आहे, आपण पाच जान आहोत, ५० रुपये टाकूया आपण! हा आमचा विचार होता.
      ८:३०ला पिक्चर सुरू होणार होता. ७: ३०ला रूम वरून निघालो. मेस लवकर बंद होत असल्याने मेस वरून जेवून निघालो. तोपर्यंत ८वाजले होते, मकबाऱ्या पर्यंत पाई आलो होतो. असेच पाई चालत राहिलो तर उशिल होईल. म्हणून ५० रुपये देऊन रिक्षा केली. टाऊन हॉल पर्यंत गेलो तेथून ८०० मीटरवर थेटर होतं. पण कोठे होतं माहिती नव्हतं.
            जो गावावरून आला होता. तो अगोदर म्हणाला, "मला थेटर माहिती आहे चला तुम्ही" आणि टाऊन हॉलच्या जवळ गेल्यावर म्हणाला, "आता मला काहीच माहीत नाही". आमच्यातला एक म्हणाला, 'मला माहिती आहे'. कारण तो कधी -कधी नाटक बघण्यासाठी इकडे -तिकडे जायचा. आम्हला ही वाटलं असेल त्याला माहिती.. त्याच्या सोबतीला आणखी एक त्याचाच चांगला मित्र आला. त्याने Google Map टाकला. जिथे आपण एका मिनिटात पोहचू शकतो तिथे त्याने लांबून फिरून आणलं. ते सतत चुकीच्या रस्त्याने जात होते. आणि आम्हालाही नेत होते. त्यांची चालण्याची "ऐट" बघून तर अस वाटत होतं की, जसं काय यांना सारं माहिती आहे. आणि त्यांच्यात तो कॉन्फिडन्स दिसत होता. पण त्यांना काहीही माहिती नव्हतं, मात्र कॉन्फिडन्स खूप होता. हे आम्हला इकडेच फिरवत होते. टाईम निघून जात होता. लगेच एकाला आठवलं थेटर तिकडे नसून, इकडे आहे. मग त्या दोन्ही महाशयांना मागे बोलावलं. कारण त्यांच्यात आणि आमच्यात जवळपास १०० मीटर चे अंतर होते. ते डोंबिवली फास्ट सारखे चालत होते तर आम्ही सीएसटी स्लो सारखे, खूप Distance होत त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये...
          एकदाचं थेटरच्या बाहेर पोहोचलो. तिकीट विचारलं तर त्याने २०० रुपये सांगितलं. येवढे पैसे नव्हते कोणाकडे, बाहेर आलो. चर्चा केली. ५०० रुपये तो देत होता. तर आणखी ५०० द्यायला कोणी तयार नव्हते. तयार कसे राहणार, पैसे नव्हतेच कोणाकडे! होते तर घरभाडे देण्याचे होते. ते नव्हतो खर्च करू शकत....
    मग काय करावं काय नाही. मग ठरलं रिटर्न जायचं नंतर बघू कधीतरी आणि हाच आशावाद घेऊन आम्ही निघालो. टाऊन हॉल जवळ आलो असेल तसा वरा सुटला. समोर काही दिसत नव्हते. डोळ्यात धूळ जात होती. तरीही आम्ही न डगमगता त्याचा सामना करीत पुढे जात होतो. आणि शेवटी पोहोचलो रूम वर! कारण सकाळ पासून चलून- चालून पाय आणि शरीर खूप थकले होते. माणूस असून आज आम्ही मशीन सारखे चालत होतो. सकाळी उठून गोगाबाबा टेकडी चढली होती, नंतर खरेदी करण्यासाठी पाईच ३ ते ४ किलोमीटर गेलो होतो, आणि तितकाच आलो होतो.आणि परत थेटरला सुुध्धा....
      ही आमची पाईवारी आता रूमवर आल्यावर थांबली होती. विश्रांतीची आणि झोपेची नितांत आवश्यकता होती. आणि मी ती पूर्ण केली. थकून आल्यामुळे झोपही मस्त लागली. सकाळी रिडिंग ला यावं वाटतं नव्हतं. कारण डोळ्यात झोप आजूनही कायम होती.तरीही फ्रेश होऊन ७ ला रीडिंग ला आलोय. आणि लिहितो आहे, आमच्या आयुष्यात येऊ पाहणाऱ्या आमच्या स्वप्नांची गोष्ट.....!
                                                      ~KUN@L

Comments

खूप छान वर्णन! खूप छान लिहिलस कुणाल 😍😍😍

Popular posts from this blog

एक तोही होता,एक तीही होती..

बंधन तोडीत यावं....

14 फेब्रुवारी ग्रीन व्हॅलेंटाईन डे💚💚💚