माणुसकीची जात निभावणारे हात आजही जिवंत आहेत....
जेवण करून नुकताच फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो होतो. आणि एका चहाच्या हॉटेल समोर कॉल वर बोलत उभा होतो.....!
तेवढ्यात पायात चप्पल नसलेला, दाढी ,केस वाढलेला आणि विशेष म्हणजे कडाक्याच्या थंडीतही स्वेटर नसलेला थंडीने थरथर कपणारा माणूस चहाच्या हॉटेलच्या दिशेने येत होता .आणि हॉटेलकडे बघत होता. त्याच्याकडे बघून काळात होतं की, त्याला त्या हॉटेल मधील काहीतरी पाहिजे होते. हे त्याकडे बघून स्पष्ट दिसत होते. पण मागणार कसे ? हॉटेल मालक काय फुकट देणार नाही. हा ही त्याच्या मनात विचार आला असेल...!
पण तेवढ्यात तिथेच एका टेबलावर 2 "माणसे" चहा पीत बसली होती. त्यातील एकाने त्या माणसाकडे बघितले आणि त्याला त्याच्या मनातील तळमळ समजली होती.आणि त्याने लगेच त्याला विचारले चहा घेणार का? तो होकार -नकार देण्याच्या आत सांगितले एक चहा "यांना ही द्या".. आणि हा व्यक्ती हॉटेल कडे गेल्या गेल्या त्यांना चहा दिला गेला. तो व्यक्ती चहा घेऊन टेबलच्या दिशेने चालू लागला. क्षणार्धात वाटले की हा ज्याने चहा दिला त्याच्यापाशी बसतोय की काय? पण तो त्या टेबलावर न बसता समोर पुढे चालू लागला होता .आणि हॉटेल च्या बाजूला एक पडदा लावलेला होता. तो माणूस तिकडे एका कोपऱ्यात विशेष म्हणजे अंधारात चहा प्यायला बसला होता.,.....!
त्याच्याकडे बघून कळलं ही माणसेही खूप "समजदार" असतात. त्याला माहिती होतं हॉटेल मालक फुकट काही देणार नाही. म्हणून तिथे शांत उभा राहून त्याला चहा मिळाला, दुसरी गोष्ट म्हणजे त्याला हे ही माहिती होतं मालक काही टेबलवर आपल्याला बसु देणार नाही. आणि मालकाची इच्छा जरी असली आणि बसविले तर लोक त्याच्या हॉटेल मध्ये येणार नाही. हे हे तो जाणून होता. म्हणून तो बाजूला अंधारात जाऊन तो चहा पीत होता.....!
अशा लोकांची व्यथा आणि कथा बघून खूप वाईट वाटते. जे अगदी गरीब, हात -पाय नसलेली, भिक मागून खाणारी, आणि विशेष म्हणजे लाचार झालेली ज्यांना खरचं माणसाच्या आश्वासनाची नव्हे तर मदतीची गरज आहे अशा व्यक्तींसाठी खूप काही करावेसे वाटते. पण मी ही बघण्याशिवाय काहीच करू शकलो नाही,......
या जगाला त्या चहाचा ऑर्डर देणाऱ्या माणसाची नितांत गरज आहे .आणि अशी माणसं घडविण्यासाठी आणि निर्माण होण्यासाठी माणुसकीची खूप गरज आहे असे मला वाटते....!
आणि ती माणुसकी निर्माण करण्यासाठी तुम्हा आम्हाला प्रयत्न करावा लागेल .. आणि "माणुसकीची जात निभावणारे हात तुमच्या आमच्यापासून तयार करावे लागतील".....!
🌹🌹 ~KUN@L
Comments